मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुरडेतील रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांचा सहभाग

सायन ब्लड आणि श्री स्वामी समर्थ मुरडे प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम

खेड : तालुक्यातील मुरडे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुरडे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ८५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.

या प्रतिष्ठानची स्थापना नुकतीच गावातील युवकांनी एकत्र येत केली होती हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या पहिलाच उपक्रम होता या उपक्रमाला गावातील सर्व युवकांनी एकत्र येत हातभार लावला.

रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते, आणि या उपक्रमाने निश्चितच गरजूंना मोठा आधार मिळाला. तर श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्या ८५ रक्तदात्यांचे मनापासून अभिनंदन केले.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविले जातील गावच्या विविध सामाजिक उपक्रमांसोबतच शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या गावासह पंचक्रोशचा नावलौकिक होईल यासाठी प्रतिष्ठान सर्वतोपरी प्रयत्न करेल असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश शिबे यांनी यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिले.

हे शिबिर पार पडण्यासाठी उपाध्यक्ष प्रवीण काताळे, सचिव श्रीधर जोशी, खजिनदार धवल शिरगावकर, सदस्य जनार्दन कावणकर, रणजित गुहागरकर, प्रतिक दळवी यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!