सीएसआयआर-सीएफटीआरआय, मैसूर येथे ‘टेक्निशियन’ पदांची भरती
१८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सीएसआयआर-केंद्रीय खाद्य प्रौद्योगिक अनुसंधान संस्थान (CSIR-CFTRI), मैसूर यांच्यामार्फत ‘टेक्निशियन’ या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या पदांसाठी १८ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सविस्तर अटी व शर्तींसाठी उमेदवारांनी खालील अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी : https://cftri.in *https://recruitment.cftri.res.in
इच्छुक व पात्र उमेदवारांनी, विशेषतः माजी सैनिक व जिल्ह्यातील संबंधित पात्रताधारक तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


