मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

विरार-भातगाव एसटी बस सुरू करावी

गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांची परीवहन मंत्र्यांकडे मागणी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे विरार – भातगाव एसटी बस सुरू होण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांनी विरार – भातगाव ही विरार आगारची नवीन एसटी बस सुरू करावी, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागचे व्यवस्थापकीय संचालक महादेव कुसेकर यांना निवेदनद्वारे केली आहे.

गुहागर तालुक्यातील भातगाव, आवरे, आबलोली, मासू, पाचेरी, कोळवली, मोंभार, असोरे, या गावातील विरार, नालासोपारा, वसई, विरार, ठाणे या ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या जनतेसाठी ही गाडी सोयीची ठरणार आहे.

मिलिंद चाचे गेली ५ वर्षे गणपती उत्सव, होळी उत्सवासाठी जादा गाडी मंजूर करून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी कुडली-अक्कलकोट ही बस ही मिलिंद चाचे यांच्या प्रयत्न मधून सुरू झाली होती. आता त्यांनी विरार – भातगाव या विरार आगाराच्या बसची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत ही बस, भातगाव, पाचेरी, मोबार, असोरे, कोळवली मासू आणि आजूबाजूच्या गावातील जनतेसाठी उपलब्ध होइल, असा विश्वास मिलिंद चाचे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!