मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी. के. गोंडाळ यांचे निधन

राजापूर : शहरानजीकच्या शीळ येथील रहिवासी व जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी. के. गोंडाळ (वय ५३) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर शीळ स्मशानभूमीत गुरुवारी सायंकाळी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री. गोंडाळ हे जुवाठी हायस्कूलमधील उपक्रमशील विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. तर तालुका ग्रंथालय चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते. आपल्या शीळ गावात त्यांनी १९९७ साली ज्ञानसागर नावाने वाचनालय सुरू केले. मुलांनी, तरुण पिढीने वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. अनेक शाळांमध्ये त्यांनी हस्ताक्षर सुधार उपक्रम राबविले. राष्ट्रसेवा दलाचेही ते सक्रिय कार्यकर्ते होते. विविध सामाजिक संघटना ते सक्रिय कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे भाऊ बहिणी पुतण्या असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!