कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

म्हसळा शहरात तीन प्राथमिक अद्ययावत डिजिटल शाळा आणि सामाजिक सभागृहाचे ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

म्हसळा (संजय खांबेटे) : लोक प्रतिनिधी म्हणून सामाजिक काम करताना म्हसळासारख्या निर्सगरम्य शहराचे आध्यात्म, संस्कृती, धर्म संस्कार टिकण्यासाठी अद्ययावत शिक्षण पद्धती ह्याच अनुषगांने म्हसळा शहरांत तीन प्राथमिक अद्ययावत बांधकामासह डिजिटल शाळा आणि श्रीराधाकृष्ण मंदिर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

यामध्ये म्हसळा नगर पंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावर, रा.जी.प प्राथमिक उर्दू शाळा आणि पी.एम.श्री. प्राथमिक मराठी शाळा नंबर १ या तीन शाळांचे आरसीएफच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून (सीएसआर फंड) आणि जेएसडब्ल्यू कंपनीकडून सुमारे ११०० चौरस फूट बांधकाम असलेले आरसीसी सामाजिक सभागृह आदिती तटकरे यांनी लोकार्पण केले.

डिजिटल शाळेच्या वैभवात भर टाकताना शाळा बांधकाम,आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छतागृह, वीज, पाणी, पंखे, संगणक, प्रिंटर, डिजिटल बोर्ड, बेंच, टेबल, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर साहित्यांचा यामध्ये समावेश आहे. खासदार सुनील तटकरे हे भारत पेट्रोलियम व नॅचरल गॅस समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सीएसआर फंडातून क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या पुढेही म्हसळा शहरातील आदिवासीवाडी, दुर्गवाडी आणि चिराठी या तीन शाळा सुसज्ज करण्याचा खासदार तटकरे यांचा मानस आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे यांच्यासह तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, ज्येष्ठ नेते अंकुश खडस, हिंदू समाज अध्यक्ष नंदू गोविलकर, सुशील यादव, मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चोगले, भाई बोरकर, सचिन करडे, वैशाली घोसाळकर, भाजपा शहर अध्यक्ष शरद चव्हाण उपविभागीय अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गट शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, सुनील शेडगे, जयश्री कापरे, नगरसेविका राखी करंबे, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, एसएमसी अध्यक्ष बाबू शिर्के, मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, नगरसेवक शाहिद जंजीरकर, शाहिद उकये, मुन्ना पानसरे, सरोज म्हशिलकर, नवसीन चोगले, मंगेश म्हशिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!