मुख्य बातमी

सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत व्यसनमुक्ती शिबिर

रत्नागिरी : सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी विभाग नियंत्रक रा. प. महामंडळ तसेच विभाग एस. टी. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर जुना माळ नाका येथील रा. प. प्रशिक्षण केंद्रात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पार पडले.

या शिबिराला प्रमुख व्याख्यात्या म्हणून निलम पालव उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, कौटुंबिक व सामाजिक जीवनावर होणारे आघात आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व यावर सविस्तर व प्रबोधनात्मक विचार मांडले. मानसिक संतुलन आणि इच्छाशक्तीच्या बळावर व्यसनांवर कशी मात करता येते, याचे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कार्यक्षमता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात एकूण ३२ लाभार्थ्यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

सहकार विभाग व एसटी महामंडळाच्या या स्तुत्य संयुक्त उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा प्रबोधनपर कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजक संस्थांच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!