मुख्य बातमी
रत्नागिरीत भाट्ये बीचवर मोफत योगसाधना वर्ग
आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत उपक्रम

रत्नागिरी : धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी निरामय योग केंद्राच्या वतीने भाट्ये बीच येथे मोफत योगसाधना वर्ग सुरू करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत निसर्गाच्या सान्निध्यात हा उपक्रम होणार आहे.
योगामुळे शारीरिक लवचिकता, स्फूर्ती आणि मानसिक शांतता वाढण्यासह एकाग्रता व सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने योगाचा अंगीकार करावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्व वयोगटांतील नागरिकांना या वर्गात विनामूल्य सहभागी होता येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९०२८८९९४१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन योगगुरू वीरू स्वामी यांनी केले आहे.



