मुख्य बातमीशैक्षणिक
खार येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

आबलोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते व विभागप्रमुख ॲड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. ९८ तर्फे तक्षशिला अकादमी येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत, कार्यालयप्रमुख व तक्षशिला अकादमीचे संचालक तुषार शेलार, महिला शाखा संघटिका पल्लवी आरोलकर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एस.आर.ए.चे अध्यक्ष जितेंद्र जाधव, उपशाखाप्रमुख अमित तळपदे, प्रसाद माळी आदी उपस्थित होते. तुषार शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



