मुख्य बातमी

श्री स्वामी समर्थ पालखीचे गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात आगमन

भक्तांची दर्शनासाठी गर्दी

गावखडी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथून श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा – मूळ पादुकांचे श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे काल (१८ फेब्रुवारी) सकाळी आगमन झाले. यावेळी स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी

दुपारी १२ वाजता श्री स्वामी देवांना नैवेद्य अर्पण करून महाआरती झाली. त्यानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी ३.३० पर्यंत दर्शनासाठी मोठी रांग होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ गावखडी व श्री स्वामी समर्थ दिगंबर चँरिटेबल ट्रस्ट यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!