मुख्य बातमी
मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती भक्तीमय वातावरणात संपन्न

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात आज (४ डिसेंबर) दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.

सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा आणि त्यानंतर ९ वाजता अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. १२.३० वाजता आरती झाली. दुपारी १ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर, भक्तगण यांनी परिश्रम घेतले.

सायंकाळी ६ वाजता भजन बुवा वासुदेव वाघे (पूर्णगड) यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



