आरोग्यक्रीडामुख्य बातमी

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे योग दिनाच्या निमित्ताने नि:शुल्क योग वर्गाचे आयोजन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.

हे निःशुल्क योग शिबिर २१ जून ते ३० जून दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता हे शिबिर प्रतिदिन होणार असून याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी यांनी जराही वेळ न दवडता आरोग्य सुदृढ करणाऱ्या निःशुल्क योग शिबिरात सहभागी व्हा असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे. या शिबिराचा लाभ नोकरदार वर्ग, गृहिणी, विदयार्थी यांना उत्तम प्रकारे होऊ शकतो.

याबाबत अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!