आबलोलीच्या मीनल संदेश कदम यांचा “पाणलोट धारिणीताई” पुरस्काराने गौरव
जागतिक महिला दिनानिमित्त आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीती आबलोली यांचा उपक्रम

आबलोली : वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समिती आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि पाणलोट क्षेत्र रथयात्रा विविध कार्यक्रमात आबलोली ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आणि बचतगटाच्या सीआरपी सौ. मीनल संदेश कदम यांना दिल्ली येथील भूमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण यांच्या हस्ते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – २.० पाणलोट यात्रा “पाणलोट धारिणीताई” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

हा कार्यक्रम डीएड कॉलेज आबलोलीच्या सभागृहात झाला. यावेळी व्यासपीठावर गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीलम पालव, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, काजुर्ली गावच्या सरपंच सौ. मेघना मोहिते, काजुर्लीचे माजी सरपंच डॉ. आंनद जोशी, आबलोली तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पा कदम, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, उपसरपंच अक्षय पागडे आदी. मान्यवर उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले.



