मुख्य बातमी

श्री रत्नागिरीचा राजा मिरवणूक; शहरातील वाहतूक मार्गात बदल

रत्नागिरी : आज (३ ऑगस्ट) रोजी ३ वाजल्यानंतर श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती मंदिर रत्नागिरी यांच्या वतीने साळवी स्टॉप ते मारुती मंदिर अशी गणपती मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मिरवणुकीसाठी अंदाजे २००० ते २५०० एवढा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मिरवणूक कालावधीत मार्गावर वाहनांची वर्दळ राहिल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यासाठी श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती मंदिर रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित गणपतीमूर्ती आगमन मिरवणूक मार्गावरील वाहनांची वाहतूक ३ ऑगस्ट रोजी बंद करणे व वाहतूक मार्गात बदल करणे आवश्यक वाटते.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६(१) (अ) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी आज सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीसाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील साळवी स्टॉप ते माळनाका ओव्हर ब्रीज (डावी बाजू) चे दिशेने येणारी वाहतूक बंद राहील. वाहतुकीस बंद केलेल्या मार्गाला साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोड-आयटीआय अभ्युदय नगर पॉवर हाऊस गजानन महाराज मंदिर- हिंदू कॉलनी मार्गे थिबा पॅलेस रोड ते माळनाका रेस्ट हाऊस मार्गे वाहतूक वळविण्यात येत आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मा. मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी परवानगी दिलेले वाहने यांना लागू होणार नाही. निकडीच्या व अत्यावश्यक प्रसंगी त्याठिकाणी तैनात असलेले संबंधित पोलीस अधिकारी हे निर्णय घेवू शकतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!