भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर
सिंधुदुर्गतील भाजप नेते प्रमोद जठार यांना संधी

मुंबई : राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून ५ नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील ५ विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली.
त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना विधान परिषदेची संधी मिळाली आहे. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते असून त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

