मुख्य बातमीराजकारण
ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क दौऱ्याला आजपासून प्रारंभ

रत्नागिरी : शिवसेना नेते सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय संपर्क दौऱ्याला आजपासून सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, शिव सहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, तालुका संघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय उर्फ बाबू मयेकर, शहर संघटक प्रसाद सावंत, युवासेना तालुकाधिकारी संदेश नारगुडे, उपतालुका प्रमुख महेंद्र चव्हाण, विभाग प्रमुख किरण तोडणकर, नयन साळवी उपस्थित होते.


