एप्रिलमध्ये सेवामुक्त केलेले कंत्राटी शिक्षक अद्यापही मानधनाविना
हजारो डी.एड., बी.ड.धारक बेरोजगार : मानधन न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा

रत्नागिरी : शासनाने कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द केल्यामुळे या सर्व शिक्षकांना ३० एप्रिलला सेवामुक्त करण्यात आले; मात्र या शिक्षकांनी केलेल्या कामाचे मानधन अद्याप मिळाले नाही. हे मानधन मिळाले नाही तर सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलनाच्या पवित्रात असून तसे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे.
जिल्हा परिषदेने १० पटाच्या आतील शाळेवर शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक बेरोजगारधारकांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिली होती. विद्यमान सरकारने निर्णय घेतल्यामुळे कोकणातील कमी पटाच्या शाळेतील मुलांना शिक्षक उपलब्ध झाले होते. त्यामुळे मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत झाली. पण याच सरकाने नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द केला. त्यामुळे या सर्व शिक्षकांना सेवामुक्त ३० एप्रिलला करण्यात आले; परंतु या शिक्षकांनी केलेल्या कामाचे मानधन अद्याप मिळाले नाही. हे मिळाले नाही तर सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलनाच्या पवित्रात असून तसे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे.
त्याच बरोबर कुठे खासगी नोकरी होती ती सोडून शिक्षकाची नोकरी मिळणार म्हणून ती स्वीकारली; परंतु या सरकारने निवडणुकीपुरते अमिश दाखवून या सर्व शिक्षकांची सरकारने दिशाभूल केली. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी या विषयाकडे गांभीर्याने बघायला तयार नाहीत. पेसा क्षेत्रात कंत्राटी शिक्षक भरती होत आहे. तिसऱ्या भाषेसाठी कंत्राटी शिक्षक शासन देत आहे; परंतु कोकणातील खेड्यापाड्यातील शाळेत शिक्षक नाही. कमी पटाच्या शाळेत एक किंवा २ शिक्षक देऊन काम सुरू आहे; परंतु त्या मुलांना पूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी आवश्यक शिक्षक नाहीत. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून कोकणासाठी स्वतंत्र शासन निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना शिक्षक ही मिळतील आणि बेरोजगार तरुणांना नोकरी देखील मिळेल.

