मुख्य बातमी

गयाळवाडी येथील विपश्यना, ध्यानधारणा केंद्राचा उद्या लोकार्पण सोहळा 

रत्नागिरी : पंचायत समिती रत्नागिरी, सेस फंड समाज कल्याण अंतर्गत खेडशीमधील एकदंत नगर गयाळवाडी येथे विपश्यना, ध्यानधारणा केंद्र व समाज मंदिराच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या हस्ते उद्या (१५ मार्च) आयोजित करण्यात आला आहे.

या लोकापर्ण सोहळ्याला समाजसेवक तथा उद्योजक अण्णा सामंत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधीकारी वैदेही रानडे, राजापूरचे आमदार किरण सामंत, जि.प.चे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बांधकाम मानसिंग कृ. पाटील, माजी बांधकाम सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, खेडशी सरपंच वसंत सोमा बंडबे, माजी सरपंच भिकाजी बारक्या गावडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!