कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

म्हसळा तालुक्यात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा

निवृत्त जवानांसोबत पावसाने दिली झेंड्याला सलामी

म्हसळा (संजय खांबेटे) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९वा वर्धापन दिन पावसाची संततधार सुरू असतानाच आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था पदाधिकारी, शाळा शिक्षक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.

शहरात आणि तालुक्यात पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत होता. तरी सर्वत्र उत्साहात ध्वजवंदन झाले. शासकीय मुख्य ध्वजवंदन सोहळा तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते राजीप कन्या शाळा पटांगणांत संपन्न झाले. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे आणि त्यांच्या पोलीस पथकाने मानवंदना दिली. म्हसळा तालुका शहरात विविध शासकीय कार्यालय, शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयाच्या इमारतीसमोर ध्वजवंदन समारंभ उत्साहात झाला.

म्हसळा तहसील कार्यालयाचे ध्वजवंदन तहसीलदार सचिन खाडे, पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पंचायत समिती गट विकास अधिकारी माधव जाधव, म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्ष संजय कर्णिक, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा चेअरमन समीर बनकर, खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे आणि मान्यवरांनी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन केले. जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील, मराठी शाळा नंबर १ मध्ये समिती अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के, ग्रामीण रुग्णालयाचे नेत्रचिकित्सक डॉ. सलीम ढलाईत, वसंतराव नाईक कॉलेज येथे फजल हळदे, प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसळा डॉ. श्रध्दा पाटील, अंजुमन हायस्कूलचे चेअरमन नासीर मिठागरे, आयडियल हायस्कूल चेअरमन नाझीम हसवारे, वीजन स्कूलमध्ये संस्था प्रमुख डॉ. मुविज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

मुख्य शासकीय कार्यक्रमात विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा, आयडियाल इंग्लिश स्कूल, विजन इंग्लिश स्कूल, वसंतराव नाईक कॉलेज, प्राथमिक मराठी व उर्दू शाळा, अंजुमन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत आणि नृत्य सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या व बक्षीस पात्र शाळा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि वृक्षरोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगर पंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, तालुका कृषी अधिकारी दतात्रय शिंदे, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, नगरसेविका सरोज म्हशिलकर, राखी करंबे, भाजपा महिला आघाडी प्रमुख रेखा धारिया आणि अपर्णा ओक, भाई बोरकर, प्रसाद बोर्ले, ॲड. मुकेश पाटील, स्वप्नील चांदोरकर, कौस्तुभ करडे, सौरव गोरेगावकर, पांडूदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवृत्त जवान बळीराम गीते आणि गौतम जवरास यांनी परेड आणि ध्वजरोहणाला दिलेल्या ऑर्डर आणि ध्वजाची सलामी विशेष आकर्षक ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!