मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पाटपन्हाळे महाविद्यालयात शहीद दिन संपन्न

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयात आय.क्यु.ए.सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागातर्फे २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाळण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई, डॉ. प्रवीण सनये व संगणक प्रशिक्षक श्री. कदम यांच्या हस्ते कॉ. शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी कॉ. शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या क्रांतिकारकांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षेपात आढावा घेतला. तसेच शहीद दिनाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाला प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, वरिष्ठ लिपिक सौ. स्नेहल संसारे, ग्रंथपाल धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण व महावि‌द्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले. आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!