मुख्य बातमी

आयटीआय संगमेश्वर २१ मेपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

रत्नागिरी : संगमेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेस मेकिंग, नळ कारागीर, सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या सहा व्यवसायासाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात २१ मेपासून सुरू होणार आहे. प्रवेशासाठी वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

पुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक व अधिक माहिती https://admission.dvet.gov.in याच संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. प्रवेशित पात्र प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी समकक्षतेची सुद्धा सोय आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळण्याची सोय आहे.

विद्यार्थ्यांनी त्याचे प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय भरणे या बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्या, असे आवाहन प्राचार्य शासकीय औ. प्र. संस्था, संगमेश्वर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७०२०८५५९३७, ९६८९१५०५१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!