महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी बिझनेस हब सतत प्रयत्न करणार : जैबा बंदरकर

रत्नागिरी : महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल करून त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला तसेच लहान लहान व्यवसाय करणाऱ्या महिलांना योग्य बाजारपेठ आणि चोखंदळ ग्राहक मिळविण्यासाठी किचन एक्स्प्रेस रत्नागिरीच्या जैबा शोएब बंदरकर यांनी नुकतेच बिझनेस हब एक्झिबिशन घेतले.
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महिला मंडळ रत्नागिरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तीन दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा शुभारंभ साईका म्हसकर, शबनम सय्यद, आजमिना मालगुंडकर, आजरा खान, आसीया, सफिरा नाईक, सायमा शेकासन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात जोया वस्तू, कोकण डायपर, फरहा मुक्री, जुवेरिया फणसोपकर,अमिना, दानिया खान, इनाया, सिमरन पिंजर, रिफा शेख, शैमा, खैरुन्निसा, फरिदा शहा, हुदा डोसानी, सुहाना खांचे, नौशीन मिरकर, सबिहा मस्तान, सायमा, आयशा, पायल बागवे, अल शिफा डेव्हलपर्स, किचन एक्स्प्रेस रत्नागिरी यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात किचन एक्स्प्रेस रत्नागिरी आणि हुसेन गोट एम्पायर मुंबई यांच्या वतीने अनुक्रमे पाच हजार आणि दोन हजार रुपये रोख रकमेचा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. हा लकी ड्रॉ प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आला. किचन एक्स्प्रेस रत्नागिरीच्या लकी विनर अलमास मुजावर ठरल्या त्यांना शकील बंदरकर, शमा बंदरकर, शोएब बंदरकर यांनी रोख रक्कम हजार रुपये दिले. तसेच हुसेन गोट एम्पायर मुंबई यांच्या लकी ड्रॉचे विनर ठरलेले श्री. फणसोपकर यांना मंजूर सय्यद हसन काद्री यांचे हस्ते दोन हजार रुपये देण्यातआले. तसेच किचन एक्स्प्रेस रत्नागिरीच्या व प्रदर्शनाच्या आयोजिका जैबा बंदरकर यांना हुसेन गोट एम्पायर मुंबई यांच्या वतीने ॲवॉर्ड इरफाना शकील गवाणकर व अजिजा नजीर जमादार यांच्या हस्ते देण्यात आले.

या तीन दिवसांत सुमारे ७०० ते ८०० ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद देताना अशा प्रकारचे प्रदर्शन लवकरच आपण पुन्हा घेऊन या महिलांना स्वावलंबी करू, असे जैबा बंदरकर यांनी सांगितले.



