मुख्य बातमी
नवोदय विद्यालयात सहावी प्रवेशासाठी १३ डिसेंबरला प्रवेश परीक्षा

रत्नागिरी : सन २०२६ मध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वाजता आपली उपस्थित रहायचे आहे.
प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. बसवराज यांनी सांगितले.



