मुख्य बातमी

ग्राहक आयोगाचे संपूर्ण कार्यालयाचे नुतनीकरण

पूर्णपणे कामकाज ठप्प हे वृत्त खोटे : अर्ध्या भागात सर्व कामे सुरळीतपणे सुरू 

रत्नागिरी : ग्राहक आयोगाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, अशी खोटी व दिशाभूल करणारी बातमी पूर्णपणे चुकीची आहे. ग्राहक आयोगाचे संपूर्ण कार्यालयाचे नुतनीकरण एकाच वेळी न करता सध्या अर्ध्या भागात (कोर्ट हॉल, अध्यक्ष व सदस्य यांचे कक्षात तसेच टेरेसवर) सुरू आहे. त्याकारणाने राहीलेल्या अर्ध्या भागात ॲडमिशन हीअरिंग, कागदपत्रे दाखल करून घेणे, नोटीसा पाठवणे इ. सर्व कामे सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्र. प्रबंधकांनी दिली आहे.

सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्हा आयोग कार्यालयाच्या नुतनीकरणाचे कामकाज सुरु असल्याने कामकाज पूर्ण होईपर्यंत दाखल सुनावणी व जाहीर करण्याची निकाली प्रकरणे (Admission Hearing & Pronouncement Order) वगळून दैनंदिन बोर्ड ४ मेपासून पुढील तीन आठवडे डिस्चार्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. ही बाब आयोगाच्या सूचना फलकावर लावण्यात आली होती. तद्नंतर २५ मेपासून पुढील तीन आठवडे दैनंदिन बोर्ड डिस्चार्ज करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रत्यक्षात रत्नागिरी आयोगाचे कामकाज हे पक्षकारांची गैरसोय होणार नाही याची व्यवस्थित दक्षता घेऊन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र मुंबई यांच्या निर्देशानुसार सुरळीतपणे चालू आहे. ग्राहक आयोगाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, अशी खोटी व दिशाभूल करणारी बातमी पूर्णपणे चुकीची आहे.

ग्राहक आयोगाचे संपूर्ण कार्यालयाचे नुतनीकरण एकाच वेळी न करता सध्या अर्ध्या भागात (कोर्ट हॉल, अध्यक्ष व सदस्य यांचे कक्षात तसेच टेरेसवर ) सुरु आहे. त्याकारणाने राहीलेला अर्धा भागात ॲडमिशन हीअरिंग, कागदपत्रे दाखल करून घेणे, नोटीसा पाठवणे इ. सर्व कामे सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र नुतनीकरणाच्या कामामुळे होणारा आवाज व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणीमुळे अंतिम सुनावणी घेणे सध्या शक्य नसल्याने त्यावर वर नमूद कालावधीसाठी मर्यादा घालण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!