जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून पाथरीत ९३ वे मरणोत्तर देहदान

वर्धा : जिल्ह्यातील पाथरी (ता. देवळी जि. वर्धा) येथील मनोहरराव कवडुजी मडावी (वय ७१) यांचे आज निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ९३ वे मरणोत्तर देहदान आहे.


कै. मनोहरराव कवडुजी मडावी यांचा मृतदेह सावंगी (मेघे) वर्धा येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यात मुलगा सतीश मनोहरराव मडावी, सून सौ. पूनम सतीश मडावी, मुलगी सौ. सविता हेमंतराव कोडापे, जावई हेमंतराव कोडापे, बहीण सुनंदा गेडाम, भाऊ अमृतराव मडावी व पुंडलिक मडावी, पुतणे सचिन मडावी, श्रीकांत मडावी, प्रवीण मडावी यांचा समावेश होता. स्व- स्वरूप संप्रदायाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आपल्या संप्रदायाला मृत्यूनंतरही लोकांच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. तुम्ही मरणोत्तर देहदान करून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीररचनाशात्र शिकण्यासाठी उपयोगी पडू शकता असे त्यांनी म्हटले होते. त्याला भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. हजारो संमती पत्रे भरून संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत एकूण ९३ जणांनी मरणोत्तर देहदान केले आहे.



