विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या शिक्षकांचा भाजप पदवीधर सेलतर्फे सन्मान

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणच्या पदवीधर सेलतर्फे विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात येणार आहे. कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
शिक्षक हे समाज घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. त्यामुळे प्रत्येक शिक्षक सन्मानास पात्र आहे. मात्र, आपल्या अध्यापनाच्या कार्यासोबतच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन देऊन अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्याचा उपक्रम पदवीधर सेलतर्फे हाती घेण्यात आला आहे.
या शिक्षक सन्मानासाठी योगेश दत्ताराम कदम (सहशिक्षक, दामले विद्यालय रनप, शाळा क्र. १५), अपर्णा प्रतापसिंह जमादार (कला शिक्षिका, GGPS), योगेश गजानन शेट्ये (मुख्याध्यापक, महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर, हरचिरी-उमरे), प्राजक्ता प्रकाश कदम (मुख्याध्यापिका, कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर), सुनील सिताराम गोठणकर (जि.प. केंद्रशाळा, वाशी तर्फे संगमेश्वर), डॉ. विनय विलास होडे (जि.प. पूर्व प्राथमिक आदर्श शाळा, हातीव नं. १, संगमेश्वर), निलीमा दीपक गोरे (जि.प. पूर्व प्राथमिक शाळा, तेरवण, राजापूर), विनोद शशिकांत मयेकर (क्रीडा शिक्षक, रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी), हणमंत विठ्ठल ऐवळे (सहशिक्षक, ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी), भारती दत्ताराम सुर्वे (गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल प्रायमरी, चिपळूण) आणि स्नेहा संदीप भागवत (गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूण) यांची निवड करण्यात आली आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे भारतीय जनता पार्टी पदवीधर सेलतर्फे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि पदवीधर सेलचे संयोजक मनोज पाटणकर यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.



