रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे नऊ उमेदवार जाहीर

रत्नागिरी : नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेकडून आज सायंकाळी नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी यशवंत जाधव, आमदार किरण सामंत, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर यांच्या उपस्थितीत ही नावे जाहीर केली.
जाहीर झालेल्या नावांमध्ये काही नवीन उमेदवारांचा समावेश केला असून, काही ठिकाणी जुन्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले आहे.

या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक २ मधून निमेश नायर, प्रभाग ३ राजन शेट्ये, प्रभाग ५ सौरभ मलुष्टे, प्रभाग ७ मधून (जागा अ – नामाप्र) गणेश भारती, प्रभाग ७ (जागा ब- सर्वसाधारण) श्रद्धा हळदणकर, प्रभाग ८ दतात्रय साळवी, प्रभाग ९ विजय खेडेकर, प्रभाग १३ (जागा अ – सर्वसाधारण स्त्री) आफ्रिन होडेकर), प्रभाग १३ (जागा ब- सर्वसाधारण) सुहेल साखरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
रत्नागिरी नगर पालिका निवडणुकीसाठी महायुतीतर्फे उद्या (१५ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता महायुतीचे (शिवसेना ९ आणि भाजप ६) एकूण १५ उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीतर्फे भव्य रॅली काढण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे जिल्हा नेते अतुल काळसेकर, सचिन वहाळकर, दीपक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.



