मुख्य बातमी
टपाल विभागात ६५ जागांसाठी भरती; ३१ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू

रत्नागिरी : टपाल विभागामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) एकूण ६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विविध प्रवर्गांमधून ही पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ३१ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भरतीचे महत्त्वाचे तपशील :
पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक (GDS)
एकूण रिक्त पदे- ६५ जागा (विविध प्रवर्ग)
अर्ज भरण्याची सुरुवात- ३१ ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची अंतिम मुदत- २१ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिकृत संकेतस्थळ- [https://indiapost.gov.in/gdsonlineengagement](https://indiapost.gov.in/gdsonlineengagement)
पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.



