मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मंडणगड न्यायालयाच्या इमारतीची पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी 

मंडणगड : येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तसेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची नव्याने उभी राहिलेल्या इमारतीची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल (२४ ऑगस्ट) पाहणी करून आढावा बैठक घेतली.

यावेळी पालकमंत्री सामंत यांनी १० सप्टेंबरपर्यंत ही इमारत पूर्णपणे हस्तांतरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या नूतन इमारतीचे लोकार्पण व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण हे दोन ऐतिहासिक कार्यक्रम मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहेत, असे यावेळी सामंत यांनी जाहीर केले.

या बैठकीसाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह प्रशासकीय अधिकारी तसेच पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!