बोरज येथे मुलींना एचपीव्ही लसीकरण

खेड : रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली आज (२५ नोव्हेंबर) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिव बु.!! उपकेंद्र मोरवंडे अंतर्गत तालुक्यातील बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमधील ९ ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी एचपीव्ही लसीबाबत माहिती दिली व लसीकरणापूर्वी किरकोळ तपासणी केली. एकूण १०४ मुलींनी लस घेतली.
यावेळी डॉ. कांबळे यांच्यासह शिक्षकवृंद, डी. डी. पांचाळ, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वंयसेविका, मदतनीस पीएचसी वाहनचालक व बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल येथील आपत्कालीन अँब्युलन्ससह टीम उपस्थित होते.
एचपीव्ही (HPV) म्हणजे काय?
-एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा विषाणू लैंगिक संपर्कातून पसरतो. यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर तसेच इतर काही कॅन्सर होऊ शकतात.
– एचपीव्ही लस ही सुरक्षित व परिणामकारक आहे.
– ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत लस उपलब्ध.
– गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी लस हा प्रभावी उपाय.
– लहान वयात घेतलेली लस आयुष्यभर संरक्षण देते.
– लसीकरणानंतरही नियमित आरोग्य तपासणी आवश्यक.
– आई-वडिलांनी ९-१४ वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण करून घ्यावे.
– कॅन्सरमुक्त समाजासाठी लस घ्या – इतरांनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

