मुख्य बातमीशैक्षणिक

जि. प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वेशभूषा ठरली विशेष आकर्षण

रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमात सुरुवातीला शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी कु. वेद पावसकर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तद्नंतर विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती कथन केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांजणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला पंचायत समिती रत्नागिरीच्या विशेष शिक्षिका श्रीमती डोर्लेकर उपस्थित होत्या. शाळेच्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!