आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी ८ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळ/प्रगतशील मधपाळ यांनी ८ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जेल रोड, बीएसएनएल ऑफिस शेजारी कुलकर्णी कम्पाउन्ड, रत्नागिरी येथे विहीत नमुन्यात अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी (०२३५२-२२२३७९) अथवा ई-मेल आयडी dvioratnagiri@mskvib.org वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!