“लेट्स इमॅजिन”चा बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रम
वाडा, विक्रमगड, कोल्हापूर आणि कोकणातील जिल्हा परिषद शाळांना होणार वितरण

मुंबई : बाप्पाच्या दर्शनाला येताना फळं, मिठाई प्रसादासाठी आणण्याऐवजी शैक्षणिक साहित्य, चित्रकलेचे साहित्य, खेळाचे साहित्य तसेच मूठभर खाऊ आणावा, जो वाडा, विक्रमगड, पालघर, कोल्हापूर आणि कोकणात देवरुख या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आपल्या छोट्या दोस्त मंडळींना देता येतील, असे आवाहन लेट्स इमॅजिन टूगेदर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
“लेट्स इमॅजिन”च्या बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रमाचे यंदाचे हे ७ वर्ष आहे. गेल्या वर्षी २२ जणांनी यात सहभाग घेतला होता. घरगुती गणपतीसोबत सार्वजनिक गणपती मंडळही या वर्षी हा उपक्रम करीत आहेत, अशी माहिती “लेट्स इमॅजिन”च्या पूर्णिमा नार्वेकर यांनी दिली. आपणही या उपक्रमांत सहभागी होऊ शकता. आपल्या घरी बाप्पा येत असेल तर आपण सुध्दा हा उपक्रम आपल्या घरी करू शकता, असेही पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले.
गेली ६ वर्ष या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सौ. पूर्णिमा नार्वेकर यांच्या समवेत ९८२०००३८३४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



