मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

वेळणेश्वरच्या माजी जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड

पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जि. प. गटाच्या माजी जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

गेल्याच महिन्यात सौ. ठाकूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता. या प्रवेशाच्या वेळेला शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळेला व्यासपीठावरून आपल्या भाषणामध्ये पालकमंत्री सामंत यांनी नेत्राताई ठाकूर या आमच्या पक्षात आल्या आहेत. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल असे सांगितले होते. त्याची प्रचिती आज वेळणेश्वर जि. प. गटाला आली असून त्यांची जिल्हा नियोजनवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पालकमंत्री सामंत यांनी नेत्रा ठाकूर यांच्यावर दाखवलेला विश्वास त्या नक्कीच सार्थ ठरवतील. याआधीही त्या जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये तालुक्यामध्ये अनेक विकास कामेही केली आहेत. याही वेळी नेत्रा ठाकूर गुहागर तालुक्यामध्ये तसेच वेळणेश्वर जिल्हा परिषद गटांमध्ये अनेक विकास कामे करतील व आपल्या पदाला योग्य न्याय मिळवून देतील, अशी खात्री आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!