मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
गणेशोत्सवात पालखी देखावा, “एक पेड माँ के नाम” संदेश, सजावटीतून मराठी भाषा गौरव आणि संवर्धन संदेश
शेळवीवाडी (हर्चे) येथील हर्षद तोडणकर यांचा देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

लांजा : तालुक्यातील शेळवीवाडी (हर्चे) येथील तोडणकर परिवारातील हर्षद तोडणकर दरवर्षी गणेशोत्सवात नाविन्यपूर्ण देखावे सादर करतात. यावर्षीही त्यांनी घरगुती गणपती सजावटीत कोकणातील पालखीतून गणरायाचे आगमन दाखवले आहे. तसेच “एक पेड माँ के नाम” हा गणेशजींचा संदेश चित्र देखावा दाखवला आहे. यात माणसा माणसा एक तरी झाड लाव, असा पर्यावरण जागृतीचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा गौरव, संवर्धन संदेश देणारा माहिती देखावा तयार करण्यात आला आहे.
या देखाव्यासाठी त्यांनी पर्यावरणपूरक साहित्य म्हणजेच पुठ्ठा, कागद यांचा वापर केला आहे. या तीनही संकल्पनेतून समाज जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या देखाव्याविषयी परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.



