Uncategorized

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळातर्फे गोळपसडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील साळवी नगर गोळपसडा येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता देवीचे आगमन होईल. त्यानंतर १० वाजता मुख्य रस्त्यापासून ढोल ताशांच्या गजरात देवीची सभामंडपापयत मिरवणूक निघेल. सकाळी ११.३० वाजता दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ. निहा आनंद साळवी यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना, पूजा, आरती होईल. रात्री ९.३० वाजता दांडियारास होईल.

नवरात्रोत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम असे :

१२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता दांडियारास, १३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता भजनांचा जंगी सामना बुवा संदीप लोके (मु. लिंगडाळ, ता.देवगड, जि. सिंधुदुर्ग) × बुवा श्रीकांत शिरसाट (मु. बडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) यांचा भजनांचा २० ×२० जंगी सामना.

१४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता दांडियारास, १५ सायंकाळी ४.३० वाजता रांगोळी स्पर्धा, ४.३० वाजता पाककला स्पर्धा, रात्री ९.३० वाजता दांडियारास. १६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ७.३० वाजता दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १० वाजता गोंधळाची कथा. १७ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महिलांचे हळदी-कुंकू, सायंकाळी ६ वाजता होममिस्टर स्पर्धा, रात्री ९.३० वाजता दांडियारास. १८ रोजी सकाळी १० होमहवन व कुवारी पुजन, रात्री १० वाजता डान्स स्पर्धा (५ ते २० वर्ष), रात्री ११ वाजता दांडियारास. १९ रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता बक्षीस वितरण, रात्री ११ वाजता शक्ती तुऱ्याचा जंगी सामना तुरेवाले शाहीर विशाल निकम (केतकी, चिपळूण, रत्नागिरी) × शक्तीवाले शाहीर वैदेही शेलार यांचा जंगी सामना (ता. खेड. जि. रत्नागिरी). २० रोजी सांयकाळी ५.३० वाजता दसरा मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता दांडियारास. २१ रोजी दुपारी ३.३० वाजता आरती व गाऱ्हाणे, ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक.

या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्या, असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा अध्यक्षा सौ. निहा साळवी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!