मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
जैतापूरचा राजा गणेशोत्सव मंडळाला आमदार किरण सामंत यांची भेट

जैतापूर (ता. राजापूर) : येथे उत्साहात साजरा होत असलेल्या जैतापूरचा राजा गणेशोत्सव मंडळाला आमदार किरण सामंत यांनी भेट दिली.
गणरायाच्या चरणी माथा टेकून आमदार सामंत यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंडळाच्या सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांचे कौतुक करताना त्यांनी “धार्मिक उत्सवाबरोबरच समाजकारणात केलेले योगदान हेच खरी सेवा आहे,” असे मत व्यक्त केले.
गणेशोत्सव हा समाजातील एकोप्याचा, बांधिलकीचा आणि संस्कारांचा उत्सव असल्याचे सांगत आमदार सामंत यांनी मंडळाच्या भावी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे गणेशभक्तांमध्ये व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.


