मुख्य बातमीराजकारण

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर

जयगड पोर्ट येथे होणार बैठक; कोतवडे भाजपा विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे उद्या (११ सप्टेंबर) रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत.

गुरुवारी सकाळी ६ वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आणि काजू महामंडळाच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जयगड पोर्ट जयगड येथे होणार आहे.

त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते कोतवडे येथे होणार आहे. त्यानंतर ना. नितेश राणे हे सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील. तिथे दुपारी १ वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!