मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण
आमदार भास्कर जाधव यांच्या नुतीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुवर्णताई भास्करराव जाधव यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले. तर केबिनचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयामध्ये गर्दी केली होती. सौ.सुवर्णाताई जाधव यांचा वाढदिवसही नवीन कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी सौ. सुवर्णाताई यांना विशेष शुभेच्छा देताना आमदार भास्कर जाधव यांनी “बार बार दिन ये आये” हे गाणे म्हणून केक भरवला.



