क्रीडामुख्य बातमी

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबला ४ सुवर्णपदक व १ कास्य पदक

कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आज रवाना

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचा वतीने, डेरवण येथे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्या खेळाडूंची निवड १२ व १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी करण्यात आली असून, ही स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी ५५ किलो वजनी गटात गौरी सारिका अभिजित विलणकर (एसव्हीएम स्कूल, १७ वर्ष वयोगट), ४९ किलो वजनी गटात त्रिशा साक्षी सचिन मयेकर (गावंडे शिवार आंबेरे, १९ वर्ष मुली), ५२ किलो वजनी गटात आध्या पूजा अमित कवितके (सेक्रेट डार्ड स्कूल डाउन, १९ वर्ष मुली), ५५ किलो वजनी गटात केशर कनिष्का कुणाल शेर (जीजीपीएस, १९ वर्ष मुली), ५६ किलो वजनी गटात अर्णव स्वाती आत्माराम मुरकुटे (जीजीपीएस, १९ वर्ष मुले)

यांची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू साळवी स्टॉप येथील छत्रपती नगर वाचनालय येथे सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, गणेश जगताप, सर्व शाळांचे मुख्याधापक, क्रीडा शिक्षक, तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोटर्स असो.चे जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश करार, सचिव लक्ष्मण के, कोषाध्यक्ष शंशाक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, डॉ. मयुरेश नडगिरी, नेव्ही ऑफिसर अदिती शिवगण, अनिकेत पवार, साहिल शिवगण व सर्व पालक वर्ग तसेच क्लबच्या अध्यक्ष ॲड. पूजा प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष सौ. साक्षी सचिन मयेकर, सचिव सौ. रंजना मोंडूला, सौ. स्नेहा मोरे, परेश मोंडूला, श्रीमती शलाका जावकर यांनी विजेत्या खेळांडूना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!