मुख्य बातमी

जिल्हा परिषद शाळा मेर्वी गुरववाडी येथे दहीहंडी उत्सव उत्साहात 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी व अंगणवाडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रममाचे नियोजन मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गाण्याचा ठेक्यावर ताल धरत या उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी सहशिक्षिका सौ. शाहनाज भाटकर, अंगणवाडी सेविका सौ. सत्यश्री खर्डे, सौ. स्नेहल कुरतडकर, श्रीमती शारदा गुरव यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ हेही उत्सवात सहभागी झाले होते. मेर्वी गुरववाडी शाळेत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!