महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

दसरा मेळाव्यासाठी ठाकरे शिवसेनेला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने काही अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. हा मेळावा शिवसेनेच्या पारंपरिक मैदानावर होणार असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे पक्षाची धोरणे, विरोधकांच्या टीका आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महानगर पालिकेने ध्वनिप्रदूषण नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, अशा विविध अटींवर परवानगी दिली आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!