रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरी

रत्नागिरी : नोंदणीकृत तथा प्रवेशोच्छुक उमेदवारांनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेल्या व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी, नाचणे रोड येथे समुपदेशन फेरीसाठी २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत फेरीसाठी व्यक्तीश: हजर राहून हजेरीची नोंदणी करणे आवश्यक आहे, असे शासकीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यांनी कळविले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, नाचणे रोड येथील आयटीआय प्रवेशाच्या समुपदेशन फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरी करता यापूर्वी ज्यांनी आय.टी.आय. रत्नागिरी येथे अर्ज भरलेले आहेत व कोणत्याही व्यवसायात प्रवेश घेतलेला नाही असे उमेदवार पात्र असतील. त्याच प्रमाणे ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत त्याच्याकरिता १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असे सर्व उमेदवार समुपदेशन फेरीकरीता पात्र असतील. आय टी. आय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
२१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत दररोज उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराने व्यक्तिशः संपूर्ण मुळ कागदपत्रे, सर्व छायांकीत, आधार कार्ड, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो व प्रशिक्षण शुल्कासहित (संकेतस्थळावर वर दिलेल्या शुल्कानुसार) उपस्थित राहणे आवश्यक आहे. या प्रवेश फेरी करता उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार व प्रवेशा करता उपलब्ध जागानुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.
नव्याने अर्ज करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, नाचणे रोड येथे २० सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेट द्यावी. प्रवेश प्रक्रिया २०२५ करीता अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी गटनिदेशक सी.आर. शिंदे, मो.क्र. ९९६७७७५३१७, गटनिदेशक, पी. जी. कांबळे, मो.नं. ९४२३८७६८८३ आणि शिल्पनिदेशक, एस. जे. पावसकर, मो.क्र. ८४२१९७९६६३ यांच्याशी संपर्क साधावा.



