मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे पंचक्रोशीतील इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत तसेच स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा तसेच एमएस- सीआयटी परीक्षेला बनणाऱ्या विद्यार्थांचा शुभेच्छा कार्यक्रम येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सैनिक सुरेश साळवी यांनी भुषविले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांना सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरेश साळवी यांच्या हस्ते सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी, सौ. सावी साळवी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक सुरेश साळवी यांच्यासह उद्योजक गजानन साळवी, जगदीश साळवी, प्रा. अमोल पवार, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, तलाठी विनोद जोशी, आयुर्वेदिक डॉ. सुभाष बहुतुल्य, संदेश साळवी, अजयभाऊ खाडे, जय शिर्के, धनदीप साळवी, पत्रकार संदेश कदम, क्रिकेटपटू कुणाल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर एमएससीआयटी उत्तीर्ण विद्यार्थांचा भेटवस्तू, आकर्षक कापडी पिशवी व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच एमएससीआयटी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते हॉलतिकीट, भेटवस्तू, आकर्षक कापडी पिशवी व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर दहावी, बारावी परीक्षेत तसेच स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांना भेटवस्तू, आकर्षक कापडी पिशवी व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.

यावेळी मोहन पागडे, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, तलाठी विनोद जोशी, जय शिर्के, खोडदेचे माजी सरपंच धनदीप साळवी, आयुर्वेदिक डॉ. सुभाष बहुतुले, उद्योजक गजानन साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडीटर जगदीश साळवी, वझे केळकर महाविद्यालय मुलुंडचे प्राध्यापक अमोल पवार, माजी सैनिक सुरेश साळवी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश साळवी यांनी केले. तर माजी सरपंच अंकुश माटल यांनी सूत्रसंचालन केले. संदेश साळवी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्राजक्ता पवार, शुभम साळवी यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!