मनसेच्या वतीने चिंचनाका येथे काश्मीर हल्ल्याचा निषेध
राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये खरोखर ताकद असेल तर पाकिस्तानला त्यांची जागा दाखवा : जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे

चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने (मनसे) शहरातील चिंचनाका येथे काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतानाच जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जाहीर निषेध करून पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करण्यात आली. काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांना मनसेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चिपळूण चिंचनाका परिसरामध्ये मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये खरोखर ताकद असेल, तर त्यांनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून द्या, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष नलावडे यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष संदेश साळवी, शहरराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, तालुकाध्यक्ष संतोष हातिसकर, उपशहराध्यक्ष सनी शेलार, विनोद चिपळूणकर, विभाग अध्यक्ष प्रफुल्ल आगरे, नितीन गोवळकर, अमित राहुत, विद्यार्थी तालुकाध्यक्ष गुरू पाटील, शहराध्यक्ष मंगेश शिंदे, शाखाध्यक्ष सुदेश फके, सनी गायकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


