मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक
संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान

संगमेश्वर : सेवा पंधरवड्यानिमित्त तालुक्यातील कसबा सप्तेश्वर मंदिर आणि ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सध्या राज्यभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचे औचित्य साधत १७ सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ८० विद्यार्थ्यांनी १० निरीक्षकांच्या उपस्थितीत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे कसबा येथील सप्तेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता केली.

या स्वच्छता मोहिमेत संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र कोकरे, शिल्प निदेशक समीर पानिंद्रे, रतन गाडे, ओंकार भडकमकर, विनोद तांबे, अजय गुरव, दया पेजे, आशिष गावडे व प्रकाश घोगले सहभागी होते.


