मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर पं. स.चे उपसभापती अभिजीत गुरव यांनी घेतली आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

राजापूर : पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) जिल्हा सरचिटणीस व धोपेश्वर गणातील पंचायत समिती सदस्य अभिजीत गुरव यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार चव्हाण यांनी गुरव यांचे अभिनंदन करत भविष्यात राजापूर तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. तसेच “तुमच्या पाठीशी मी आहे,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राजापूर तालुका पंचायत समितीवर शिवसेना-भाजप महायुतीची पूर्ण बहुमताने सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत महायुतीकडून उपसभापतीपदी श्री. गुरव यांची बिनविरोध निवड झाली. गुरव हे धोपेश्वर पंचायत समिती गणातून भाजपाचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपाच्या राजापूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली असून सध्या ते जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.

उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर भाजपाकडून गुरव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी गुरव यांना शुभेच्छा देत उपसभापतीपदाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेची कामे मार्गी लावण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!