दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या (गोळप सडा) नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील साळवी नगर गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सवनिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
२२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता देवीचे आगमन होईल. १० वाजता मुख्य रस्त्यापासून ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत देवीची सभामंडपापर्यंत मिरवणूककाढली जाईल., ११.३० वाजता दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्ष सौ. निहा आनंद साळवी यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठापना, पूजा, आरती होईल. रात्री ९.३० वाजता दांडियारास होईल. २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दररोजी रात्री ९.३० वाजता दांडियारास खेळला जाईल. तर २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा गुंडू सांवत यांचा भजनांचा 20×20 जंगी सामना होईल. २७ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५.३० वाजता गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम, ७.३० वाजता दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १० वाजता गोंधळाची कथा असा कार्यक्रम होईल. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांचे हळदी-कंकू, ६ वाजता होममिस्टर स्पर्धा होईल. या स्पर्धेसाठी केतन झगडे (9421707589) संपर्क साधावा. रात्री ९.३० वाजता दांडिया रास खेळला जाईल. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पाककला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा होणार असून, त्यासाठी केतन झगडे यांच्याशी संपर्क साधावा. रात्री ९.३० वाजता दांडियारास होईल.
३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होमहवन व कुवारी पुजन, रात्री १० वाजता डान्स स्पर्धा (वयोगट ५ ते २०), रात्री ११ वाजता दांडियारास खेळला जाईल. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. रात्री ११ वाजता तुरेवाले शाहीर योगेश जाधव (रायगड) विरुद्ध शक्तीवाले शाहीर तेजस पवार यांचा शक्ती तुऱ्याचा जंगी सामना रंगेल. ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दसरा निमित्त मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता आरती, ९.३० वाजता दांडियारास होईल. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता आरती-गाऱ्हाणे दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक, तर सायंकाळी ७.३० वाजता आरती होणार आहे.
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्या, असे आवाहन साळवी नगर गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्ष सौ. निहा साळवी यांनी केले आहे.



