पटवर्धन हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमेश तायडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी भुषविले. यावेळी उप मुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले, तर मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेषतः राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या खुशी विद्याधर कांबळे या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.

राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून श्रीमती वेल्हाळ यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रभाषा परीक्षा बक्षीस वितरण निवेदन श्रीमती हर्षाली शिंदे यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी विषयावर आपली मनोगते व्यक्त केली. ज्युनिअर विभागातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे गीत सादर केले, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायले. या विद्यार्थ्यांना श्री. पाडळकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख श्री. गोरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन शबनम तहसीलदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मुळीक यांनी मानले.
<span;>हिंदी दिनानिमित्त झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी अभिमान व जागरूकता निर्माण करणारा ठरला.



