मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
चिपळूण येथे ‘आरपीआय’तर्फे (आठवले) महामानवाला अभिवादन

आबलोली (संदेश कदम) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूण तालुका यांच्या वतीने चिपळूण येथे महामानव, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस भिले गावचे उपसरपंच उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस अमोल कदम, सहसचिव भूपेंद्र पवार, संघटक सुदेश पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



