मुख्य बातमी

पूर्णगड समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून सागरी सीमा मंच दक्षिण रत्नागिरी (ता. जि. रत्नागिरी) यांच्यामार्फत २० सप्टेंबर रोजी तालुक्यातील पूर्णगड समुद्र किनारा परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात पूर्णगड ग्रामस्थ, पालक, पूर्णगड मराठी नं. १ शाळा, पूर्णगड खारवीवाडा शाळा, पूर्णगड उर्दू शाळा यांचे शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, सरकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या उपक्रमांतर्गात पूर्णगड सागरी किनारा परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. पावसकर, गावचे प्रतिष्ठित नागरिक वासुदेव वाघे, दादा वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाध्ये सहभागी सर्वांचे आभार मानून या उपक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!